भक्तीचीये पोटी – काकड आरती PDF मराठी
Download PDF of Bhaktichiye Poti Kakad Aarti Marathi
Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
भक्तीचीये पोटी – काकड आरती मराठी Lyrics
|| भक्तीचीये पोटी – काकड आरती PDF ||
भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती ॥
पंचप्राणे जीवे भावे ओवाळू आरती ॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडुनी चरणी ठेविला माथा ॥
भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती..
काय महिमा वर्ण आता सांगणे ते किती ॥
कोटि ब्रह्महत्या मुख पाहता जाती ॥
भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती..
विटेसहित पाउले जिवे भावे ओवाळू ॥
कोटी रवि शशि जैसे उगवले हेळू ॥
भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती..
राई रखुमाबाई दोघी उभ्या दो बाही ॥
मयुरपिच्छचामरे ढाळिती ठाईच्या ठाई ॥
भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती..
तुका म्हणे दीप घेउनी उन्मनीत शोभा ॥
विटेवरी उभा जैसा लावण्यगाभा ॥
भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowभक्तीचीये पोटी – काकड आरती

READ
भक्तीचीये पोटी – काकड आरती
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
Your PDF download will start in 15 seconds
CLOSE THIS
