जेजुरी गड पर्वत – जेजुरीच्या खंडोबाची आरती PDF मराठी
Download PDF of Jejuri Gad Jejurichya Khandobachi Aarti Marathi
Shiva ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
जेजुरी गड पर्वत – जेजुरीच्या खंडोबाची आरती मराठी Lyrics
॥ जेजुरी गड पर्वत – जेजुरीच्या खंडोबाची आरती ॥
जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नाना परिची रचना रचली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्हारी तूचि प्रचंडा ॥
मणिमल्ल दैत्य प्रबल तो जाहला ।
त्रिभुवनी त्याने प्रलय मांडिला ॥
नाटोपे कोणास वरदे मातला ।
देवगण गंधर्व कापती त्याला ॥
जय देव जय देव जय शिव मार्तंडा..
चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥
चरणी पृष्ठी खड्गे वर्मी स्थापिसी ।
अंती वर दे दैत्या मुक्ती पै देसी ॥
जय देव जय देव जय शिव मार्तंडा..
मणिमल्ल नामे मल्लारी देवा ।
संकट पडले आहे जेजुरी ॥
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाव मागे दास नरहरी ॥
जय देव जय देव जय शिव मार्तंडा..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowजेजुरी गड पर्वत – जेजुरीच्या खंडोबाची आरती
READ
जेजुरी गड पर्वत – जेजुरीच्या खंडोबाची आरती
on HinduNidhi Android App