पंचप्राणांचे नीरांजन – निरांजन आरती PDF मराठी
Download PDF of Panchprananche Niranjan Niranjan Aarti Marathi
Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
॥ पंचप्राणांचे नीरांजन – निरांजन आरती ॥
पंचप्राणांचे नीरांजन करुनी ।
पंचतत्त्वे वाती परिपूर्ण भरुनी ॥
मोहममतेचे समूळ भिजवोनि ।
अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोती ॥ १ ॥
जय देव जय देव जय नीरांजना ।
नीरांजन ओवाळू तुझिया समचरणा ॥ ध्रु० ॥
ज्वाला ना काजळी दिवस ना राती ।
सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती ॥
पूर्णानंदे धालो बोलो मी किती ।
उजळो हे शिवराम भावे ओवाळिती ॥
जय देव जय देव० ॥ २ ॥
पंचप्राणांचे नीरांजन – निरांजन आरती
READ
पंचप्राणांचे नीरांजन – निरांजन आरती
on HinduNidhi Android App