श्रीशशिनाथा – चंद्राची आरती PDF मराठी
Download PDF of Shashinatha Chandrachi Aarti Marathi
Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
श्रीशशिनाथा – चंद्राची आरती मराठी Lyrics
॥ श्रीशशिनाथा – चंद्राची आरती ॥
जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।
आरती ओवाळू पदि ठेउनि माथा ॥
उदयी तुझ्या हृदयी शीतलता उपजे ।
हेलावुनि क्षीराब्धी आनंदे गर्जे ॥
विकसित कुमुदिनि देखुनि मन ते बहु रंजे ।
चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥
जय देव जय देव जय श्रीशशिनाथा..
विशेष महिमा तुझा न कळे कोणासी ।
त्रिभुवनि द्वादशराशी व्यापुनि आहेसी ॥
नवही ग्रहांमध्ये उत्तम तूम होसी ।
तुझे बल वांछिती सकळहि कार्यासी ॥
जय देव जय देव जय श्रीशशिनाथा..
शंकरगणनाथादिक भूषण मिरवीती ।
भाळी मौळी तुजला संतोषे धरिती ॥
संकटनामचतुर्थीस पूजन जे करिती ।
संतति संपद पावुनि भवसागर तरती ॥
जय देव जय देव जय श्रीशशिनाथा..
केवळ अमृतरूप अनुपम्य वळसी ।
स्थावर जंगम यांचे जीवन आहेसी ॥
प्रकाश अवलोकिता मन हे उल्हासी ।
प्रसन्न होउनि आता लावी निजकासी ॥
जय देव जय देव जय श्रीशशिनाथा..
सिंधूतनया इंदू बंधु श्रीयेचा ।
सुकीर्तिदायक नायक उडुगण जो यांचा ॥
कुरंगवाहनचंद्रा अनुचित हे वाचा ।
गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ॥
जय देव जय देव जय श्रीशशिनाथा..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowश्रीशशिनाथा – चंद्राची आरती
READ
श्रीशशिनाथा – चंद्राची आरती
on HinduNidhi Android App