जय श्रीस्वामी समर्था – अक्कलकोट स्वामींची आरती PDF मराठी
Download PDF of Shriswami Samartha Akkalkot Swaminchi Aarti Marathi
Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
जय श्रीस्वामी समर्था – अक्कलकोट स्वामींची आरती मराठी Lyrics
|| जय श्रीस्वामी समर्था – अक्कलकोट स्वामींची आरती PDF ||
जयदेव जयदेव जय श्रीस्वामीसमर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा ॥
छेली-खेडेग्रामी तू अवतरलासी ।
जगदुद्धारासाठी राया तु फिरसी ॥
भक्तवत्सल खरा तू एक होसी ।
म्हणूनि शरण आलो तूझे चरणासी ॥
जय श्रीस्वामीसमर्था…
त्रैगुण परब्रह्म तूझा अवतार ।
त्याची काय वर्ण लीला पामर ॥
शेषादिक शिणले, नलगे त्या पार ।
तेथे जडमूढ कैसा करु मी विस्तार ॥
जय श्रीस्वामीसमर्था…
देवाधिदेवा तु स्वामीराया ।
निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया ॥
तुजसी अर्पण केली आपुली ही काया ।
शरणागता तारी तू स्वामीराया ॥
जय श्रीस्वामीसमर्था…
अघटित लीला करुनी जडमूढ उद्धरिले ।
कीर्ति ऐकुनि कानी चरणी मी लोळे ॥
चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले ।
तुझ्या सूता नलगे चरणवेगळे ॥
जय श्रीस्वामीसमर्था…
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowजय श्रीस्वामी समर्था – अक्कलकोट स्वामींची आरती

READ
जय श्रीस्वामी समर्था – अक्कलकोट स्वामींची आरती
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
Your PDF download will start in 15 seconds
CLOSE THIS
