त्र्यंबकेश्वराची आरती PDF मराठी
Download PDF of Tryambakeshwarachi Aarti Marathi
Shiva ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
त्र्यंबकेश्वराची आरती मराठी Lyrics
॥ त्र्यंबकेश्वराची आरती ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो ।
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीचा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ।
विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा…
पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥
त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥
प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ।
औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा…
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णं किती हो ।
आणिकही बहु तीर्थे गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ।
तुझिया दर्शनमात्रै प्राणी मुक्तीतें पावती हो ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा…
ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥
तें तें काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ।
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवर्धे त्यांचें झडे हो ।
केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा…
लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ।
संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ।
वि नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥
निंदन विसरे संसारयातना हो ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा…
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowत्र्यंबकेश्वराची आरती
READ
त्र्यंबकेश्वराची आरती
on HinduNidhi Android App