जय माये तुळशी – तुळशीची आरती PDF मराठी
Download PDF of Tulashichi Aarti Marathi
Tulsi Mata ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
जय माये तुळशी – तुळशीची आरती मराठी Lyrics
॥ तुळशीची आरती ॥
जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी ॥
ब्रह्मा केवळ मूळी मध्ये तो शौरी ।
अग्री शंकर तीर्थ शाखापरिवारी ॥
सेवा करिती भावे सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी ॥
जय देवी जय माये तुळशी..
शीतल छाया भूतलव्यापक तू कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ॥
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तूझ शुभ कार्तिकमासी ॥
जय देवी जय माये तुळशी..
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकाली जो हे उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी ॥
जय देवी जय माये तुळशी..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowजय माये तुळशी – तुळशीची आरती
READ
जय माये तुळशी – तुळशीची आरती
on HinduNidhi Android App