Download HinduNidhi App
Misc

दत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा

Dattachi Aarti Dhanya He Pradakshina Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ दत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा ॥

धन्य हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची ।
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥

गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी ।
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥

धन्य हे प्रदक्षिणा…

पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥

धन्य हे प्रदक्षिणा…

मृदंगताघोषी भक्त भावार्थे गाती ।
नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥

धन्य हे प्रदक्षिणा…
कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां ॥
मोक्ष लागे पायांता ॥

धन्य हे प्रदक्षिणा…

प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला ।
श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला ।
धन्य हे प्रदक्षिणा ॥

धन्य हे प्रदक्षिणा…

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षिणा PDF

Download दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षिणा PDF

दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षिणा PDF

Leave a Comment