॥ साईबाबाची आरती ॥
आरती साईबाबा ।
सौख्यदातारा जीवा ।
चरणरजतळी ।
द्यावा दासा विसावा ।
भाक्ता विसावा ॥
जाळुनिया अनंग ।
स्वस्वरूपी राहे दंग ।
मुमुक्षु जनं दावी ।
निज डोळा श्रीरंग ॥
आरती साईबाबा…
जया मनी जैसा भाव ।
तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाधना ।
ऐसी तुजी ही माव ॥
आरती साईबाबा…
तूमचे नाम ध्याता ।
हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी ।
मार्ग दावीसी अनाथा ॥
आरती साईबाबा…
कलियुगी अवतार ।
सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे ।
स्वामी दत्त दिगंबर ॥
आरती साईबाबा…
आठा दिवसा गुरुवारी ।
भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ॥
आरती साईबाबा…
माझा निजद्रव्य-ठेवा ।
तव चरणरजसेवा ।
मागणे हेचि आता ।
तुम्हा देवधिदेवा ॥
आरती साईबाबा…
इच्छित दीन चातक ।
निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या ।
सांभाळ आपुली भाक ॥
आरती साईबाबा…
Read in More Languages:- hindiसाईं बाबा मध्याह्नकाल आरति
- malayalamഷിരിഡി സായി ബാബാ രാത്രികാല ആരതി
- marathiसाई बाबा रात्रिकाल आरति
- gujaratiસાઈ બાબા રાત્રિકાલ આરતિ
- hindiसाईं बाबा रात्रिकाल आरती
- englishShri Sai Baba Aarti
- hindiश्री साई बाबा आरती
- hindiश्री साईं आरती
Found a Mistake or Error? Report it Now