Download HinduNidhi App
Bhairava

भैरवनाथाची आरती

Bhairavnathachi Aarti Marathi

BhairavaAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ भैरवनाथाची आरती ॥

जय देव जय देव जय भैरवनाथा।
सुंदर पदयुग तुझे वंदिन निजमाथा ॥

भैरवनाथा गौरव दे मज भजनाचे ।
रौरव संकट नाशी जनना- निधनाचे ॥
निशिदिनि देवा दे मज गुणकीर्तन वाचे।
कैरवपदनखचंद्री करि मन मम साचे ॥

जय देव जय देव जय भैरवनाथा…

भवभयभजन सज्जनरजन गुरुदेवा।
पदरणअंजन लेता प्रगटे किन ठेवा ॥
जेव्हा दर्शन देसी भाग्योदय तेव्हा ।
अनंत पुण्ये लाधे आम्हा तय सेवा ॥

जय देव जय देव जय भैरवनाथा…

कलिमलशमना दानवदमना दे पाणी ।
डमरूरव अमराते निर्भय सुखदानी ॥
काशीरक्षक तक्षकमालाधर चरणी।
तोडर मिरवी अरिंगन मस्तकि मनकर्णी ॥

जय देव जय देव जय भैरवनाथा…

लक्षी करुणाचक्षी अनुचर निजपक्षी ।
भक्षी दुष्टा सुष्टा संरक्षी ॥
साक्षी कर्माकर्मी जगदंतरकुक्षी।
मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृद्धी ॥

जय देव जय देव जय भैरवनाथा…

सोनारी पुरधामी भैरव कुळस्वामी ।
स्मरता सत्वर पावसि संकटहरनामी ॥
इच्छित देसी दासा जो जो जे कामी।
मुक्तेश्वरीम हेतू निश्चय कुळधर्मी ॥

जय देव जय देव जय भैरवनाथा…

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
भैरवनाथाची आरती PDF

Download भैरवनाथाची आरती PDF

भैरवनाथाची आरती PDF

Leave a Comment