Download HinduNidhi App
Misc

जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना – परशुरामाची आरती

Jamadagnikulbhushan Parshuramachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना – परशुरामाची आरती ॥

जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना ।
अतिसज्जन मनमोहन रजनीकरवदना ॥
अगणित महिमा तुझा न कळे सुरगणा ।
वदतो कंठी वाणी सरसीरुहनयना ॥

जय राम श्रीरम जय भार्गवरामा ।
नीरांजन करु तुजला परिपूर्णकामा ॥

सह्याद्रिगिरिशिखरी शर घेउनि येसी ।
सोडुनि शर पळवीसी पश्चिमजलधीसी ॥
तुजसम रणधीर जगी न पडे दृष्टीसी ।
प्रताप थोर तुझा नकळे कवणासी ॥

जय राम श्रीरम जय भार्गवरामा..

तव कोप बहु पापी बाणे संहारी ।
दानवदहन करुनी वससी गिरिशिखरी ॥
क्षत्रिय मारुनि अवनी केली निवैरी ।
सात्त्विक राजस तामस त्रिगुणा उद्धरी ॥

जय राम श्रीरम जय भार्गवरामा..

द्रुढ भावे तव वंदन करिती जे चरणी ।
त्याते भवभय नाही जंववरि शशितरणी ॥
शर मारुनी उद्भविली गंगा जनतरणी ।
चिंतामणि शरणागत निश्चित तव चरणी ॥

जय राम श्रीरम जय भार्गवरामा..

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना - परशुरामाची आरती PDF

Download जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना - परशुरामाची आरती PDF

जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना - परशुरामाची आरती PDF

Leave a Comment