मंगलाष्टके पाठ मराठी PDF मराठी
Download PDF of Mangalashtak Marathi
Misc ✦ Ashtakam (अष्टकम संग्रह) ✦ मराठी
मंगलाष्टके पाठ मराठी मराठी Lyrics
।। मंगलाष्टके पाठ ।।
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं ||
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।।
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।।
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।।
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।।
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।।
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।।
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।।
|| मंगलाष्टके पाठ विधी आणि लाभ ||
मंगलाष्टके पाठ करण्याची विधी
- पाठ सुरू करण्यापूर्वी घरातील पूजा स्थळ स्वच्छ करा आणि स्वतःही स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
- पूजा स्थळी गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. त्यासमोर एक तांब्या किंवा पितळेचा तांबा पाण्याने भरा आणि त्यावर फुलांचे तोरण ठेवा.
- एक तुपाचा दिवा लावून पूजा स्थळ उजळ करा.
- प्रथम गणपतीला हलकासा गंध, अक्षता, फुले, दूर्वा अर्पण करा. गणपतीच्या मंत्रांचे उच्चारण करून पूजा करा.
- मंगलाष्टकांचा पाठ जोराने आणि शुद्ध उच्चारणासह करा. पाठ सुरू करण्याआधी “श्री गणेशाय नमः” असे म्हणा. पाठ करताना मन शांत ठेवा आणि श्रद्धेने मंत्रांचे उच्चारण करा.
- पाठ झाल्यानंतर गणपतीला नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटा.
मंगलाष्टके पाठाचे लाभ
- मंगलाष्टकेचा पाठ केल्याने विवाह संबंधित अडथळे दूर होतात आणि योग्य जीवनसाथी मिळतो.
- घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- नवविवाहित दाम्पत्याने मंगलाष्टके पाठ केल्यास वैवाहिक जीवन सुखमय होते.
- पाठ केल्याने मन शांत होते आणि चित्त प्रसन्न होते.
- घरातील संकटे आणि अडचणींवर मात करण्यासाठी मंगलाष्टके प्रभावी ठरतात.
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowमंगलाष्टके पाठ मराठी
READ
मंगलाष्टके पाठ मराठी
on HinduNidhi Android App