Download HinduNidhi App
Misc

श्री मंगळागौरीची आरती

Manglagaurichi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

।। श्री मंगळागौरीची आरती ।।

जय देवी मंगळागौरी । ओंवाळीन सोनियाताटीं ।।
रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती ।। धृ।।

मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया ।।१।।

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा ।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे ।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली ।। २।।

साळीचे तांदुळ मुगाची डाळ । आळणीं खिचडी रांधिती नारी ।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।। ३।।

डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती । कळावी कांकणें गौरीला शोभती ।।
शोभली बाजुबंद । कानीं कापांचे गवे । ल्यायिली अंबा शोभे ।। ४ ।।

न्हाउनी माखुनी मौनी बैसली । पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली ।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।। ५।।

सोनिया ताटीं घातिल्या पंचारती । मध्यें उजळती कापुराच्या वाती ।।
करा धूप दीप । आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।। ६ ।।

लवलाहें तिघे काशीसी निघाली । माउली मंगळागौर भिजवू विसरली ।।
मागुती परतुनीयां आली । अंबा स्वयंभू देखिली ।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे । कळस वरती मोतियांचा ।। ७ ।।

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download श्री मंगळागौरीची आरती PDF

श्री मंगळागौरीची आरती PDF

Leave a Comment