Misc

श्री मंगळागौरीची आरती

Manglagaurichi Aarti Marathi Lyrics

Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| श्री मंगलागौरीची आरती PDF ||

जय देवी मंगळागौरी ।
ओंवाळीन सोनियाताटीं ।।
रत्नांचे दिवे ।
माणिकांच्या वाती।
हिरेया ज्योती ।। धृ।।

मंगळमूर्ती उपजली कार्या।
प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।।
तिष्ठली राज्यबाळी ।
अयोषण द्यावया ।।१।।

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या ।
सोळा तिकटीं सोळा दूर्वा ।।
सोळा परींची पत्री ।
जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे ।।
पारिजातकें मनोहरें ।
नंदेटें तगरें ।
पूजेला ग आणिली ।। २।।

साळीचे तांदुळ मुगाची डाळ ।
आळणीं खिचडी रांधिती नारी ।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।। ३।।

डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती ।
कळावी कांकणें गौरीला शोभती ।।
शोभली बाजुबंद ।
कानीं कापांचे गवे ।
ल्यायिली अंबा शोभे ।। ४ ।।

न्हाउनी माखुनी मौनी बैसली ।
पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली ।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।। ५।।

सोनिया ताटीं घातिल्या पंचारती ।
मध्यें उजळती कापुराच्या वाती ।।
करा धूप दीप ।
आतां नैवेद्य षड्रस पक्वानें ।
तटीं भरा बोनें ।। ६ ।।

लवलाहें तिघे काशीसी निघाली ।
माउली मंगळागौर भिजवू विसरली ।।
मागुती परतुनीयां आली ।
अंबा स्वयंभू देखिली ।।
देउळ सोनियाचे ।
खांब हिरेयांचे ।
कळस वरती मोतियांचा ।। ७ ।।

Found a Mistake or Error? Report it Now

श्री मंगळागौरीची आरती PDF

Download श्री मंगळागौरीची आरती PDF

श्री मंगळागौरीची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App