॥ ओवाळू आरती – विठ्ठलाची आरती ॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीराया ।
माझ्या पंढरीमाया ॥
सर्वभावे शरण आलो तूझिया पाया ॥
सर्व व्यापुनि कैसे रूप राहिले अकळ ।
रूप राहिले अकळ ॥
तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥
ओवाळू आरती माझ्या…
निजस्वरूप गुणातीत अवतार ।
धरी अवतार धरी ॥
तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥
ओवाळू आरती माझ्या…
भक्तांच्या काजा कैसा रूपासी आला ।
कैसा रूपासी आला ॥
ब्रीदाचा तोडरू चरणी मिरविला ॥
ओवाळू आरती माझ्या…
आरति आरति कैसा ओवाळीली ।
कैसी ओवाळीली ॥
वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥
ओवाळू आरती माझ्या…
भावभक्तीबळे होसी कृपाळू देवा ।
होसी कृपाळू देवा ॥
तुका म्हणे तुझ्या न कळता मावा ॥
ओवाळू आरती माझ्या…
Found a Mistake or Error? Report it Now