Download HinduNidhi App
Misc

संतमंडळी – संतांची आरती

Santmandali Santanchi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ संतमंडळी – संतांची आरती ॥

आरती संतमंडळी ॥
हाती घेउनि पुष्पांजळी ॥
ओवाळीन पंचप्राणे ॥
त्यांचे चरण न्याहाळी ॥ ध्रु० ॥

मच्छेद्र गोरक्ष ॥
गैनी निवृत्तीनाथ ॥
ज्ञानदेव नामदेव ॥
खेचर विसोबा संत ॥
सोपान चांगदेव ॥
गोरा जगमित्र भक्त ॥
कबीर पाठक नामा ॥
चोखा परसा भागवत ॥

आरती संतमंडळी..

भानुदास कृष्णदास ॥
वडवळसिद्ध नागनाथ ॥
बहिरा पिसा मुकुंदराज ॥
केशवस्वामी सूरदास ॥
रंगनाथ वामनस्वामी ॥
जनजसवंत दास ॥

आरती संतमंडळी..

एकनाथ रामदास ॥
यांचा हरिपदी वास ॥
गुरुकृपा संपादिली ॥
स्वामी जनार्दन त्यास ॥
मिराबाई मुक्ताबाई ॥
बहिणाबाई उदास ॥
सोनार नरहरी हा ॥
माळी सावता दास ॥

आरती संतमंडळी..

रोहिदास संताबाई ॥
जनी राजाई गोणाई ॥
जोगा परमानंद साळ्या ॥
शेख महंमद भाई ॥
निंबराज बोधराज ॥
माथा तयांचे पायी ॥
कूर्मदास शिवदास ॥
मलुकदास कर्माबाई ॥

आरती संतमंडळी..

नारा म्हादा गोदा विठा ॥
प्रेमळ दामाजीपंत ॥
तुकोबा गणेशनाथ ॥
सेना नरसी महंत ॥
तुळसीदास कसबया ॥
पवार संतोबा भक्त ॥
महिपती तुम्हापासी ॥
चरणसेवा मागत ॥

आरती संतमंडळी..

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download संतमंडळी - संतांची आरती PDF

संतमंडळी - संतांची आरती PDF

Leave a Comment