Download HinduNidhi App
Misc

सिद्धराया – सिद्धारूढस्वामीची आरती

Siddharaya Siddharudhaswamichi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ सिद्धराया – सिद्धारूढस्वामीची आरती ॥

आरती सिद्धराया ।
करू द्वैत सोडोनीया ॥
आशा ममता तृष्णा-बीज ।
टाका तुम्ही जाळोनीया ॥

चित्सुख परात्पर ।
नाम सिद्धारुढ सार ॥
देव भक्त तूचि होसी ।
क्रीडा करिसी अपार ॥

आरती सिद्धराया…

काम, क्रोध, लोभ ।
देही नांदती स्वयंभ ॥
हेची शत्रू दूर होता ।
आम्हा होसी तू सुलभ ॥

आरती सिद्धराया…

भक्ति प्रेम तूज प्रीय ।
म्हणुनि सगुणरूपी सोय ॥
हुबळीत सिद्ध रूपे ।
होसी भक्तांची तू माय ॥

आरती सिद्धराया…

नामाचा तू अभिमानी ।
आले पूर्ण ते कळोनी ॥
कधी नाही उपेक्षिले ।
जे का लागले भजनी ॥

आरती सिद्धराया…

श्रीधर दास तुझे पोर ।
करू नको कधी दूर ॥
अखंडित तुझ्या पायी ।
ठेवा करूनि स्थिर ॥

आरती सिद्धराया…

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download सिद्धराया - सिद्धारूढस्वामीची आरती PDF

सिद्धराया - सिद्धारूढस्वामीची आरती PDF

Leave a Comment