त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती PDF मराठी
Download PDF of Tribhuvanmanditmal Shobhatase Ramchandrachi Aarti Marathi
Shri Ram ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती मराठी Lyrics
॥ त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती ॥
त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा ।
आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा ॥
श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥
ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण ।
मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥
श्रीराम जय राम जय जय राम…
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती ।
स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि करिती ।
श्रीराम जय राम जय जय राम…
रत्नखचित माणिक वर्ण काय मुगुटी ।
आरती ओवाळू चवदा भुवनांचे पोटी ॥
श्रीराम जय राम जय जय राम…
विष्णुदास नामा म्हणे मागतो तूते ।
आरती ओवाळू पाहू सीतापतीते ॥
श्रीराम जय राम जय राम ॥
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowत्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती
READ
त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती
on HinduNidhi Android App