उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती PDF मराठी
Download PDF of Utkat Sadhuni Shila Ramchandrachi Aarti Marathi
Shri Ram ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती मराठी Lyrics
॥ उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती ॥
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह-अहंभाव रावण निवटोनी ॥
जय एव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा ॥
प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी बुवनी त्राहाटीला ।
आनंदाची गुढी घेउनिया अला ॥
जय एव जय देव निजबोधा रामा…
निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले आयोध्ये रघुनाथा ॥
आनंदे वोसंडे वैराग्य भरता ।
आरति घेउनि आली कौसल्या माता ॥
जय एव जय देव निजबोधा रामा…
अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार ।
अठरा पद्म वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर ॥
जय एव जय देव निजबोधा रामा…
सहज सिंहासनी राजा रघुवीर ।
सोहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासा स्वामी आठवे ना विसर ॥
जय एव जय देव निजबोधा रामा…
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowउत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती
READ
उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती
on HinduNidhi Android App