॥ वैनतेया – गरुडाची आरती ॥
जय देव जय देव जय वैनतेया ।
आरती ओवाळू तुज पक्षीवया ॥
हरिवहनाऽमृतहरणा कश्यपनंदना ।
दिनकरसारथिबंधो खगकुलमंडना ॥
कांचनमयबाहू नाम सूपर्ण ।
नारायनसांनिध्ये वंद्य तू जाण ॥
जय देव जय देव जय वैनतेया..
त्वय्यारूढ होऊनि विष्णूचे गमन ।
मुनींद्रद्वचने केले सागरझडपन ॥
जलचरी वर्तला आकांत जाण ।
विनते पयोब्धीने केले सांत्वन ॥
जय देव जय देव जय वैनतेया..
तूझे नाममंत्र जपती जे कोण ।
सर्पादिक विषबाधा नोहे निशिदिन ॥
ऐसा तू महाराजा पक्षींद्र जाण ।
म्हणवुनि कवि हा तुजला अनन्य शरण ॥
जय देव जय देव जय वैनतेया..
Found a Mistake or Error? Report it Now