|| लोलो लागला अंबेचा आरती PDF Marathi ||
लोलो लागला अंबेचा,
भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा,
धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।
प्रपंच खोटा हा,
मृगपाणी घोरे फिरतो प्राणी।
कन्या-सुत-दारा-धन माझे मिथ्या वदतो वाणी।
अंती नेतील हे यमदुत।
न ये संगे कोणी। निर्गुण रेणुका कुळदेवी जपतो मी निर्वाणी।। लोलो।।१।।
लोलो लागला अंबेचा,
भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा,
धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।
पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर।
नयनी देखिला आकार।
अवघा तो ईश्वर।
नाही सुख – दुःख देहाला कैचा अहंकार।
पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शून्याकार।। लोलो।।२।।
लोलो लागला अंबेचा,
भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा,
धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।
ध्याता मुद्रा ही उन्मनी लागे अनुसंधानी।
निद्रा लागली अभिध्यानी जें का निरंजनी।
लीला वर्णिता स्वरूपाची शिणली शेशवाणी।
देखिला भवानी जननी त्रैलोक्यपावनी।। लोलो।।३।।
लोलो लागला अंबेचा,
भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा,
धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।
गोंधळ घालील मी अंबेचा घोष अनुहाताचा।
दिवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा।
आहं सोहं से उदो उदो बोलली चारी वाचा।।। लोलो।।४।।
लोलो लागला अंबेचा,
भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा,
धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।
पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथ जगदंबा अवधूत।
दोघे भोपे भट।
जेथे मोवाळे विंजाळे प्रणीता पाणी लोट।
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रम्हनिष्ठ।।५।।
- marathiआम्ही चुकलो जरी तरी काही आरती
- marathiकापराची ज्योत अंबे ओवाळु तुजला
- marathiअश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो आरती
- marathiश्री शांतादुर्गेची आरती
- marathiदुर्गे दुर्घट भारी – देवीची आरती
- gujaratiમાં જય અધ્ય શક્તિ આરતી
- englishShri Saptashrunga Amba Aarti
- hindiज्वाला देवी आरती
- englishJwala Devi Aarti
- hindiश्री उमा देवी आरती
- hindiश्री तारा देवी आरती
- marathiसंतोषी मातेची आरती
- englishShri Naina Devi Aarti
- hindiमहागौरी माता आरती
- hindiकात्यायनी माता आरती
Found a Mistake or Error? Report it Now