Durga Ji

आम्ही चुकलो जरी तरी काही​ आरती

Amhi Chukalo Jari Aarti Marathi Lyrics

Durga Ji ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| आम्ही चुकलो जरी तरी काही​ आरती PDF ||

आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।

तुझे नांव आनंदी साजे|
तुझा महिमा त्रिभुवनी गाजे|
तुझे सगुणरूप विराजे|
तुला वंदिती सन्मुनि, राजे।
गुण गाती वेदशास्त्रेही ।।१ ।।

आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।

आम्ही अनाथ, दीन भिकारी।
तूं समर्थ, प्रभु अधिकारी।
आम्ही पतित पातकी भारी।
तूं पावन भव संसारी।
तू पर्वत, आम्ही रजराई || २ ||

आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।

आम्ही कुपुत्र म्हणवुन घेऊ।
तू नको कुमाता होऊ|
आम्ही विषय ढेकळे खाऊ।
तूं प्रेमामृत दे खाऊ|
आम्ही रांगू तू उभी राही || ३ ||

आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।

आम्ही केवळ जडमूढप्राणी|
चैतन्यस्वरूप तू शहाणी।
फट बोबडी आमुची वाणी।
तूं वदू नको आमच्या वाणी।
आम्ही रडू तू गाणे गाई ।। ४ ।।

आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।

आम्ही चातक तुजविण कष्टी।
तू करी कृपामृत वृष्टी।
म्हणे विष्णुदास धरी पोटी।
अपराध आमुचे कोटी।
अशी आठवण असू दे हृदयी || ५ ||

आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download आम्ही चुकलो जरी तरी काही​ आरती PDF

आम्ही चुकलो जरी तरी काही​ आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App