|| दत्तात्रयप्रभुची – दत्ताची आरती PDF ||
आरती दत्तात्रयप्रभुची ।
कराची सद्भावे त्याची ॥
श्रीपदकमळा लाजविती ।
वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥
कटिस्थित कौपित ती वरती ।
छाटी अरुणोदय वरि ती ॥
वर्णं काय तिची लीला।
हीच प्रसवली,
मिष्ट अन्न बहुम तुष्टचि झाले,
ब्रह्म क्षत्र आणि,
वैश्य शूद्रही सेवुनिया जीची ।
अभिरुची सेवुनिया जीची ॥
आरती दत्तात्रयप्रभुची…
गुरुवर सुंदर जगजेठी।
ज्याचे ब्रह्मांडे पोटी ॥
माळा सुविलवित कंठी।
बिंबफळ रम्य वर्ण ओष्ठी ॥
अहा ती कुंदरदनशोभा ।
दंडकमंडलु,
शंखचक्र करि,
गदापद्म धरि,
जटामुगुट परि,
शोभतसे ज्यायी ।
मनोहर शोभतसे व्याची ।
आरती दत्तात्रयप्रभुची…
रुचिरा सौम्य युग्मदृष्टी ।
जिने द्विचा तारियला कुष्ठी ॥
दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी।
केला तिनेच संतुष्टी ॥
दयाला किती म्हणूनि वर्ण।
बंच्या वृद्धा,
तिची सुश्रद्धा,
पाहुनि विबुधची,
पुत्ररत्न जिस,
देउनियां सतिची।
इच्छा पुरविली मनिची ॥
आरती दत्तात्रयप्रभुची…
देवा अघटित तव लीला।
राजकहीं चक्रवर्ति केला ॥
दावुनि विश्वरूप मुनिला ।
द्विजोदरशूल पके हरिला ॥
दुभविली वांझ महिषि एक ।
निमिषामाजी,
श्रीशैल्याला,
तंतुक नेला,
पतिताकरची,
वेद वदविला,
महिमा अशी ज्याची ।
स्मरहो महिमा अशि ज्याची ॥
आरती दत्तात्रयप्रभुची…
ओळखुनि शूदभाव चित्ती ।
दिधले पीक अमित शेती ॥
भूसुर एक शुष्कवृत्ती ।
क्षणाचे धनद तया करिती ॥
ज्याची अतुल असे करणी।
नधन झाकुची,
सवे उघडितां,
नेला काशिस,
भक्त पाहता,
वार्ता अशि ज्याची।
स्मरा हो वार्ता अशि व्याची ॥
आरती दत्तात्रयप्रभुची…
दयाकुल औदुंबरी मूर्ती।
नमोता होय शांतवृत्ती ॥
न देती जननमरण पुढती।
सत्य है चरा न मनि भ्रांती ॥
सनातन सर्वसाक्षि ऐसा।
दुस्तर हा भव,
निस्तरायचा,
जाउनि सत्वर,
आम्हि सविस्तर,
पूजा करु त्याची।
चला हो पूजा करु त्याची ॥
आरती दत्तात्रयप्रभुची…
तल्लिन होउनि गुरुचरणी।
जोडुनि भक्तराज पाणी ॥
मागे हेचि जनकजननी।
अंती ठाव देई चरणी ॥
नको मज दुणे आणिक काही ।
भक्तवत्सला,
दीनदयाळा,
परम कृपाळा,
श्रीपदकमळा,
दास नित्य याची ।
उपेक्षा करु नको साची ॥
आरती दत्तात्रयप्रभुची…
Found a Mistake or Error? Report it Now


