॥ जय देव विठाबाई – नैवेद्यारती ॥
जय देव जय देव जय विठाबाई ॥
पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायी ॥
षड्रसपक्वान्ने ही अर्पित तुज माई ॥
कृपा करूनी ती तू मान्य करुनि घेई ॥
तृप्ती सर्व जीवा जेविता तु आई ॥
जीवन सर्वांचे हे असे तव पायी ॥
जय देव जय विठाबाई…
आनंदे भोजन करावे आता ॥
यथेच्छ जेउनी उच्छिष्ट उरता ॥
तो प्रसाद देई आपुल्या भक्ता ॥
हेचि मागे ठेवुनि तव चरणी माथा ॥
जय देव जय विठाबाई…
Found a Mistake or Error? Report it Now