|| श्रीव्याडेश्वर आरती ||
भार्गवनिर्मित पावन अपरांत भूमी ।
त्यामाजी अवतरला जगताचा स्वामी ।
व्याडी स्थापित लिंगे गुप्तचि राहिला ।
शरणागत जे भाविक तारित त्यां सकळा ॥
जयदेव जयदेव श्री व्याडेश्वरा ।
प्रणिपात साष्टांग तुज गंगाधरा ।
जयदेव जयदेव ॥ धृ॥
अंबामाता आणिक शोभे गणपती ।
गरुडासह मारूती नंदी तो पुढती ।
श्रीपती लक्ष्मी सूर्य भवती बैसले ।
पंचायतन रूपे मंदिर शोभले ॥ २॥
जयदेव जयदेव श्री व्याडेश्वरा ।
प्रणिपात साष्टांग तुज गंगाधरा ।
जयदेव जयदेव ॥ धृ॥
सात्विक तो गाभारा पिंडी तव त्यात ।
सप्त वदनी फणिधर धरतो वरि छत्र ।
संतत धार धराया अभिषेक पात्र ।
ध्यानचि सुंदर दिसले गिरीशा सुपात्र ॥
जयदेव जयदेव श्री व्याडेश्वरा ।
प्रणिपात साष्टांग तुज गंगाधरा ।
जयदेव जयदेव ॥ धृ॥
ॐ श्रीव्याडेश्वराय नमः ।
Found a Mistake or Error? Report it Now