Download HinduNidhi App
Misc

आरती रामदासा – रामदासाची आरती

Ramadasa Ramdasachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ आरती रामदासा – रामदासाची आरती ॥

आरती रामदासा ।
भक्तविरक्त ईशा |
उगवला ज्ञानसूर्य ।
उजळोनी प्रकाश ॥

साक्षात शंकराचा ।
अवतार मारुती ॥
कलिमाजी तेचि जाली ।
रामदासांची मूर्ती ॥

आरती रामदासा…

वीसही दशकांचा ।
दासबोध ग्रंथ केला ॥
जडजीवा उद्धरीले ।
नृप शिवासी तारिले ॥

आरती रामदासा…

ब्रह्मचर्य व्रत ज्याचे ।
रामरूप सृष्टि पाहे ॥
कल्याण तिही लोकी ।
समर्थ सद्गुरुपाय ॥

आरती रामदासा…

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download आरती रामदासा - रामदासाची आरती PDF

आरती रामदासा - रामदासाची आरती PDF

Leave a Comment