Download HinduNidhi App
Misc

दत्तात्रयप्रभुची – दत्ताची आरती

Dattatrayprabhuchi Dattachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ दत्तात्रयप्रभुची – दत्ताची आरती ॥

आरती दत्तात्रयप्रभुची ।
कराची सद्भावे त्याची ॥

श्रीपदकमळा लाजविती ।
वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥
कटिस्थित कौपित ती वरती ।
छाटी अरुणोदय वरि ती ॥

वर्णं काय तिची लीला।
हीच प्रसवली, मिष्ट अन्न बहुम तुष्टचि झाले, ब्रह्म क्षत्र आणि, वैश्य शूद्रही सेवुनिया जीची ।
अभिरुची सेवुनिया जीची ॥

आरती दत्तात्रयप्रभुची…

गुरुवर सुंदर जगजेठी।
ज्याचे ब्रह्मांडे पोटी ॥
माळा सुविलवित कंठी।
बिंबफळ रम्य वर्ण ओष्ठी ॥

अहा ती कुंदरदनशोभा ।
दंडकमंडलु, शंखचक्र करि, गदापद्म धरि, जटामुगुट परि, शोभतसे ज्यायी ।
मनोहर शोभतसे व्याची ।

आरती दत्तात्रयप्रभुची…

रुचिरा सौम्य युग्मदृष्टी ।
जिने द्विचा तारियला कुष्ठी ॥
दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी।
केला तिनेच संतुष्टी ॥

दयाला किती म्हणूनि वर्ण।
बंच्या वृद्धा, तिची सुश्रद्धा, पाहुनि विबुधची, पुत्ररत्न जिस, देउनियां सतिची।
इच्छा पुरविली मनिची ॥

आरती दत्तात्रयप्रभुची…

देवा अघटित तव लीला।
राजकहीं चक्रवर्ति केला ॥
दावुनि विश्वरूप मुनिला ।
द्विजोदरशूल पके हरिला ॥

दुभविली वांझ महिषि एक ।
निमिषामाजी, श्रीशैल्याला, तंतुक नेला, पतिताकरची, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ।
स्मरहो महिमा अशि ज्याची ॥

आरती दत्तात्रयप्रभुची…

ओळखुनि शूदभाव चित्ती ।
दिधले पीक अमित शेती ॥
भूसुर एक शुष्कवृत्ती ।
क्षणाचे धनद तया करिती ॥

ज्याची अतुल असे करणी।
नधन झाकुची, सवे उघडितां, नेला काशिस, भक्त पाहता, वार्ता अशि ज्याची।
स्मरा हो वार्ता अशि व्याची ॥

आरती दत्तात्रयप्रभुची…

दयाकुल औदुंबरी मूर्ती।
नमोता होय शांतवृत्ती ॥
न देती जननमरण पुढती।
सत्य है चरा न मनि भ्रांती ॥

सनातन सर्वसाक्षि ऐसा।
दुस्तर हा भव, निस्तरायचा, जाउनि सत्वर, आम्हि सविस्तर, पूजा करु त्याची।
चला हो पूजा करु त्याची ॥

आरती दत्तात्रयप्रभुची…

तल्लिन होउनि गुरुचरणी।
जोडुनि भक्तराज पाणी ॥
मागे हेचि जनकजननी।
अंती ठाव देई चरणी ॥

नको मज दुणे आणिक काही ।
भक्तवत्सला, दीनदयाळा, परम कृपाळा, श्रीपदकमळा, दास नित्य याची ।
उपेक्षा करु नको साची ॥

आरती दत्तात्रयप्रभुची…

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download दत्तात्रयप्रभुची - दत्ताची आरती PDF

दत्तात्रयप्रभुची - दत्ताची आरती PDF

Leave a Comment