|| गुरूची आरती ||
सगुण हे आरती निर्गुण ओवाळू ॥
कल्पनेचे घृत घालू दीप पाजळू ॥ १ ॥
ओवाळू आरती सद्गुरुनाथा, श्रीगुरुनाथा ॥
भावे चरणकमळावरी ठेविला माथा ॥ ध्रु० ॥
अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडू ॥
आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडू ॥
ओवाळू ॥ २ ॥
सद्गुरूचे पूजनकेले षोडशोपचारी ॥
रामानंद जीवनमुक्त झाला संसारी ॥
ओवाळू० ॥ ३ ॥
Found a Mistake or Error? Report it Now