Download HinduNidhi App
Misc

जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती

Janmata Pandurange Namdevachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती ॥

जन्मता पांडुरंगे ॥
जिव्हेवरी लिहिले ॥
अभंग शतकोटी ॥
प्रमाण कवित्व रचिले ॥

जय जयाजी भक्तराया ॥
जिवलग नामया ॥
आरती ओवाळिता ॥
चित्त पालटे काया ॥

घ्यावया भक्तिसुख ॥
पांडुरंगे अवतार ॥
धरूनिया तीर्थमिषे ॥
केला जगाचा उद्धार ॥

जय जयाजी भक्तराया..

प्रत्यक्ष प्रचीती हे ॥
वाळवंट परिस केली ॥
हारपली विषमता ॥
द्वैतबुद्धी निरसली ॥

जय जयाजी भक्तराया..

समाधि महाद्वारी ॥
श्रीविठ्ठलचरणी ॥
आरती ओवाळितो ॥
परिसा कर जोडूनी ॥

जय जयाजी भक्तराया..

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download जन्मता पांडुरंगे - नामदेवाची आरती PDF

जन्मता पांडुरंगे - नामदेवाची आरती PDF

Leave a Comment