मंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती PDF मराठी
Download PDF of Mangalagauri Naam Tujhe Mangalagaurichi Aarti Marathi
Parvati Ji ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
मंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती मराठी Lyrics
॥ मंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती ॥
मंगलागौरी नाम तुझे ॥
तुला नमन असो माझे ॥
भवदुःखाचे हे ओझे ॥
देवी उतरावे सहजे ॥
जय माये मंगलागौरी ॥
तुजला पुजू अंतरी ॥
नानाविधि उपचारी ॥
दीप ओंवाळू सुंदरी ॥
गजाननाची तूं माता ॥
शंकराची प्रिय कांता ॥
हिमाचलाची तू दुहिता ॥
मज तारिं तारिं आतां ॥
जय माये मंगलागौरी…
लागें तुझ्या चरणाशीं ॥
जाळीं पापांचिया राशी ॥
भक्ति ठसावी मानसीं ॥
अंबे न्यावें पायांपाशीं ॥
जय माये मंगलागौरी…
गौरी ओवाळित्यें दीप ॥
नेणें तुझें नामरूप ॥
वाढवावें सौभाग्य अमूप ॥
विश्यची तूं मायबाप ॥
जय माये मंगलागौरी…
रिकामीं ही खटपट ॥
शुद्धमार्गी लावी नीट ॥
परब्रह्म घनदाट ।।
द्यावी नारायणी भेट ॥
जय माये मंगलागौरी…
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowमंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती
READ
मंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती
on HinduNidhi Android App