Parvati Ji

मंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती

Mangalagauri Naam Tujhe Mangalagaurichi Aarti Marathi Lyrics

Parvati Ji ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| मंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती PDF ||

मंगलागौरी नाम तुझे ॥
तुला नमन असो माझे ॥
भवदुःखाचे हे ओझे ॥
देवी उतरावे सहजे ॥

जय माये मंगलागौरी ॥
तुजला पुजू अंतरी ॥
नानाविधि उपचारी ॥
दीप ओंवाळू सुंदरी ॥

गजाननाची तूं माता ॥
शंकराची प्रिय कांता ॥
हिमाचलाची तू दुहिता ॥
मज तारिं तारिं आतां ॥

जय माये मंगलागौरी…

लागें तुझ्या चरणाशीं ॥
जाळीं पापांचिया राशी ॥
भक्ति ठसावी मानसीं ॥
अंबे न्यावें पायांपाशीं ॥

जय माये मंगलागौरी…

गौरी ओवाळित्यें दीप ॥
नेणें तुझें नामरूप ॥
वाढवावें सौभाग्य अमूप ॥
विश्यची तूं मायबाप ॥

जय माये मंगलागौरी…

रिकामीं ही खटपट ॥
शुद्धमार्गी लावी नीट ॥
परब्रह्म घनदाट ।।
द्यावी नारायणी भेट ॥

जय माये मंगलागौरी…

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

मंगलागौरी नाम तुझे - मंगळागौरीची आरती PDF

Download मंगलागौरी नाम तुझे - मंगळागौरीची आरती PDF

मंगलागौरी नाम तुझे - मंगळागौरीची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App