Download HinduNidhi App
Misc

मार्तंडाष्टक – खंडोबाची आरती

Martandashtak Khandobachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ मार्तंडाष्टक – खंडोबाची आरती ॥

त्रैलोक्यी मणिमल्ल दैत्यसकळा अजिंक्य झाले मही ।
त्याही ब्राह्मण यज्ञहोम हवने विध्वंसिली सर्वही ॥
आला ते समयीं सदाशिवस्वये सोडोनि ब्रह्मांड हो ।
तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो ॥१॥

संगे घेऊनि सप्तकोटि गण हे आला असे भूतला ।
खंडेराव म्हणोनिया अवगला शरत्वतेची लिला ॥
सक्रोधे मणिमल्ल मर्दुनि तया केला पहा दंड हो ।

तो हा पाहु चला ॥२॥

संतोषे गन सर्वदा उथळिती भंडार देवावरी ।
झालासे विजयी म्हणोनि दिवट्या लावोनिया पेंबरी ॥
केला वास शिवे तळ्या उचलिल्या निर्दाळिले लंड हो ।

तो हा पाहु चला ॥२॥

घेता हा अवतार दुष्ट दमुनी सद्भक्त संरक्षिले ।
गाई ब्राह्मण यज्ञयाग सगळे हे धर्म संस्थापिले ॥
गाती भक्त, ऋशि, गण सदा सत्कीर्ति उदंड हो ।

तो हा पाहु चला ॥४॥

प्रारंभी स्थल पेंबरी, तदुपरी पालीस आला असे ।
निमगावी तिसरे विशेष चवथे हे जेजुरीचे दिसे ॥
ऐशी योजुनि स्थानके विचों नौखंड पृथ्वीत हो ।

तो हा पाहु चला ॥५॥

शोभे दिव्यकळा सुरंग पिवळा आपादपर्यंत हो ।
घाले लोचन पाहता मुखशशी तो हा म्हाळसाकांत हो ॥
अश्वारूढ करी सळंब झळके ते शस्त्र आखंड हो ।

तो हा पाहु चला ॥६॥

ऐशा या कुलदेवतास नमुनी जो नित्य भावे भजे ।
त्याला काय उणे? न मागत तरी अप्राप्त तेही दिजे ॥
दाता देईल भुक्तिमुक्ति समुळी वारूनि पाखंड हो ।

तो हा पाहु चला ॥७॥

मार्तंडाष्टक जो पठेल अथवा ऐकेल अत्यादरे ।
त्याचे हा कळिकाळ दास्य करुनि राहील हो हे करे ॥
तेतेह शाश्वत रंगला निजसुखे नासूनिया बंड हो ।

तो हा पाहु चला ॥८॥

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download मार्तंडाष्टक - खंडोबाची आरती PDF

मार्तंडाष्टक - खंडोबाची आरती PDF

Leave a Comment