Misc

ओवाळू आरती – विठ्ठलाची आरती

Ovalu Aarti Viththalachi Aarti Marathi Lyrics

Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| ओवाळू आरती – विठ्ठलाची आरती PDF ||

ओवाळू आरती माझ्या पंढरीराया ।
माझ्या पंढरीमाया ॥
सर्वभावे शरण आलो तूझिया पाया ॥

सर्व व्यापुनि कैसे रूप राहिले अकळ ।
रूप राहिले अकळ ॥
तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥

ओवाळू आरती माझ्या…

निजस्वरूप गुणातीत अवतार ।
धरी अवतार धरी ॥
तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥

ओवाळू आरती माझ्या…

भक्तांच्या काजा कैसा रूपासी आला ।
कैसा रूपासी आला ॥
ब्रीदाचा तोडरू चरणी मिरविला ॥

ओवाळू आरती माझ्या…

आरति आरति कैसा ओवाळीली ।
कैसी ओवाळीली ॥
वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥

ओवाळू आरती माझ्या…

भावभक्तीबळे होसी कृपाळू देवा ।
होसी कृपाळू देवा ॥
तुका म्हणे तुझ्या न कळता मावा ॥

ओवाळू आरती माझ्या…

Found a Mistake or Error? Report it Now

ओवाळू आरती - विठ्ठलाची आरती PDF

Download ओवाळू आरती - विठ्ठलाची आरती PDF

ओवाळू आरती - विठ्ठलाची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App