ओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती PDF मराठी
Download PDF of Ovalu Madangopala Krushnachi Aarti Marathi
Shri Krishna ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
ओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती मराठी Lyrics
॥ ओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती ॥
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥
चरणकमल ज्याचे अति सुकुम ।
ध्वजवज्रांकुश चरणी ब्रीदाचा तोडर ॥
ओवाळू आरती मदनगोपाळा..
नाभिकमळी ज्याचे ब्रह्मयाचे स्थान ।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन ।
ओवाळू आरती मदनगोपाळा..
मुखकमला पाहतां सूर्याच्या कोटी ।
वेधले मानस हारपली द्रुष्टी ।
ओवाळू आरती मदनगोपाळा..
जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान ।
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ॥
ओवाळू आरती मदनगोपाळा..
एका जनार्दनी देखियेले रूप ।
रूप पाहो जाता झाले अवघे तद्रूप ॥
ओवाळू आरती मदनगोपाळा..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती
READ
ओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती
on HinduNidhi Android App