श्री व्यंकटेश जी आरती

|| आरती ||

शेषाचल अवतार तारक तूं देवा ।
सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ॥

कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा ।
कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥

जय देव जय देव जय व्यंकटेशा ।
केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ॥

हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तू तें ।
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ॥

देखुनि तुझे स्वरूप सुख अद्‌भुत होते ।
ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होते ॥

॥ इति श्री व्यंकटेश आरती संपूर्णम् ॥

Leave a Comment