Misc

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती

Datta Aarti Shri Guru Dattaraj Murti Ovalito Preme Aarti Marathi Lyrics

Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती​ PDF ||

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ॥

ब्रम्हा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा|
कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा|
धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटेचा|
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी,हातामधे अयुधे बहुत वरूनी ,|
तेणे भक्तांचे क्लेश हरूनी,त्यासी करूनी नमन|
अघशमन होईल रिपुदमन, गमन असे त्रिलोक्यावरती|

……… ओवाळीतो प्रेमे आरती॥१॥

गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेसी|
भीमा अमर संगमासी भक्ती असे बहूत सुशिष्यांची|
वाट दावूनीया योगाची ठेव देत असे निज मुक्तीची|
काशी क्षेत्री स्नान करितो करविरी भिक्षेला जातो|
माहुरी निद्रेला वरीतो तरतरीत छाती, भरजरित|
नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती|

……… ओवाळीतो प्रेमे आरती ॥२॥

अवधुत स्वामी सुखानंदा ओवाळीतो सौख्यकंदा|
तारी हा दास रुदनकंदा सोडवी विषय मोहछंदा|
आलो शरण अत्रीनंदा दावी सद्गुरु ब्रम्हनंदा|
चुकवी चौरयांशीचा फेरा घालीती षडरिपू मज घेरा|
गांजीती पुत्र पौत्र दारा वदवी भजन मुखी, तव|
पूजन करीत असे सुजन तयांचे या दासावरती|

……… ओवाळीतो प्रेमे आरती ॥३॥

Found a Mistake or Error? Report it Now

Download श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती PDF

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App