आम्ही चुकलो जरी तरी काही आरती PDF मराठी
Download PDF of Amhi Chukalo Jari Aarti Marathi
Durga Ji ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
आम्ही चुकलो जरी तरी काही आरती मराठी Lyrics
|| आम्ही चुकलो जरी तरी काही आरती PDF ||
आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।
तुझे नांव आनंदी साजे|
तुझा महिमा त्रिभुवनी गाजे|
तुझे सगुणरूप विराजे|
तुला वंदिती सन्मुनि, राजे।
गुण गाती वेदशास्त्रेही ।।१ ।।
आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।
आम्ही अनाथ, दीन भिकारी।
तूं समर्थ, प्रभु अधिकारी।
आम्ही पतित पातकी भारी।
तूं पावन भव संसारी।
तू पर्वत, आम्ही रजराई || २ ||
आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।
आम्ही कुपुत्र म्हणवुन घेऊ।
तू नको कुमाता होऊ|
आम्ही विषय ढेकळे खाऊ।
तूं प्रेमामृत दे खाऊ|
आम्ही रांगू तू उभी राही || ३ ||
आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।
आम्ही केवळ जडमूढप्राणी|
चैतन्यस्वरूप तू शहाणी।
फट बोबडी आमुची वाणी।
तूं वदू नको आमच्या वाणी।
आम्ही रडू तू गाणे गाई ।। ४ ।।
आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।
आम्ही चातक तुजविण कष्टी।
तू करी कृपामृत वृष्टी।
म्हणे विष्णुदास धरी पोटी।
अपराध आमुचे कोटी।
अशी आठवण असू दे हृदयी || ५ ||
आम्ही चुकलो जरी तरी काही।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ ।
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowआम्ही चुकलो जरी तरी काही आरती
READ
आम्ही चुकलो जरी तरी काही आरती
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
Your PDF download will start in 15 seconds
CLOSE THIS
