Durga Ji

आश्विनशुद्धपक्षी अंबा – नवरातीची आरती

Ashwinshuddhapakshi Amba Navratichi Aarti Marathi Lyrics

Durga JiAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

॥ आश्विनशुद्धपक्षी अंबा – नवरातीची आरती ॥

आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ।
मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेउनी हो ।
ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो ॥ १ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णं तिचा हो ॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो ॥

उदो बोला उदो अंबाबाई..

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ।
मळवर पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठींची पदके कांसे पीतांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।

उदो बोला उदो अंबाबाई..

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ।
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो ।
पूर्णकृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ॥
भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो ।

उदो बोला उदो अंबाबाई..

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो ।
अर्थ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो ॥
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो ।

उदो बोला उदो अंबाबाई..

षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो ॥
घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो ॥
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।

उदो बोला उदो अंबाबाई..

सप्तमीचे दिवशी सप्तश्रृंगगडावरी हो ॥
तेथे तू नांदसी भोवतीं पुष्पे नानापरी हो ।
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटीपडता झेलुनि घेसी वरचेवरी हो ।

उदो बोला उदो अंबाबाई..

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायनी हो ।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझें मोहिले शरण आलो तुजलागुनी हो ।
स्तनपान देउनि सुखी केले अंतःकरणी हो ।

उदो बोला उदो अंबाबाई..

नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो ।
सप्तशतीजप होमहवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रसअन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ।
आचार्यब्राह्मणा तृप्त केले कृपेकरुनी हो ।

उदो बोला उदो अंबाबाई..

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो ।
सिंहारूढे दारुण शस्त्रे अंबे त्वा घेउनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो।

उदो बोला उदो अंबाबाई..

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
आश्विनशुद्धपक्षी अंबा - नवरातीची आरती PDF

Download आश्विनशुद्धपक्षी अंबा - नवरातीची आरती PDF

आश्विनशुद्धपक्षी अंबा - नवरातीची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App