Download HinduNidhi App
Misc

नामरूपी चालक – एकनाथाची आरती

Naamrupi Chalak Eknathachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ नामरूपी चालक – एकनाथाची आरती ॥

नामरूपी चालक व्यापक तू एक ॥
म्हणुनी एका नामे पाचारिति लोक ॥
ज्याचे नामें न चले विषयाचा पंक ॥
जनार्दनाजवळी कीर्तीचा जनक ॥

जय देव जय देव जय एकनाथा ॥
निर्विकार ब्रह्म तूची तत्त्वता ॥
नामे भवकुंजर ताडूनी लाथा ॥
भक्तप्रतिपालक कळिकाळमाथा ॥

निर्मळ गोदातटी मुनिराज हंस ॥
निर्गुण प्रतिष्ठानी केला रहिवास ॥
लोकत्रयी मिरवी कीर्तीचा घोष ॥
आचार विचार निर्मळ निर्दोष ॥

जय देव जय एकनाथा..

अपर भानुकूल उगवला भानू ॥
सूर्याचा सूर्य दैदीप्यमानू ॥
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर मानू ॥
कृपादृष्टी करुनी वारिसि रजरेणू ॥

जय देव जय एकनाथा..

भगवद्भावे करुनी सकळांशी मैत्री ॥
जन्म म्हणुनी विश्वामित्राचे गोत्री ॥
विश्व तरले हरिनामाचे मंत्री ॥
पाहू न शके जवळ कळिकाळ नेत्री ॥

जय देव जय एकनाथा..

ब्राह्मणतीर्थी पूजे, नामाचा महिमा ॥
सत्कर्मे लोटली मोक्षाची सीमा ॥
नाना मतांचिया वंदूनी गरिमा ॥
मुक्तेश्वर तेथे धरियेला प्रेमा ॥

जय देव जय एकनाथा..

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
नामरूपी चालक - एकनाथाची आरती PDF

Download नामरूपी चालक - एकनाथाची आरती PDF

नामरूपी चालक - एकनाथाची आरती PDF

Leave a Comment