Shani Dev

शनिदेवाची आरती

Shanidevachi Aarti Marathi Lyrics

Shani DevAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| शनिदेवाची आरती ||

जय जय श्रीशनिदेवा ।
पद्मकर शिरी ठेवा ॥
आरती ओवाळीतो ।
मनोभावे करुनी सेवा ॥

जय जय श्रीशनिदेवा..

सूर्यसुता शनिमूर्ती ।
तुझी अगाध कीर्ती ॥
एकमुखे काय वर्ण ।
शेषा न चले स्फूर्ती ॥

जय जय श्रीशनिदेवा…

नवग्रहामाजी श्रेष्ठ ।
पराक्रम थोर तूझा ॥
ज्यावरी तू कृपाकरिसी ।
होय रंकाचा राजा ॥

जय जय श्रीशनिदेवा..

विक्रमासारिखा हो ।
शककर्ता पुण्यराशी ॥
गर्व धरिता शिक्षा केली ।
बहु छळियेले त्यासी ॥

जय जय श्रीशनिदेवा..

शंकराच्या वरदाने ।
गर्व रावणे केला |
साडेसाती येता त्यासी ।
समूळ नाशासी नेला ॥

जय जय श्रीशनिदेवा..

प्रत्यक्ष गुरुनाथा ।
चमत्कार दावियेला ॥
नेऊनी शूळापाशी ।
पुन्हा सन्मान केला ॥

जय जय श्रीशनिदेवा..

ऐसे गुण किती गाऊ ।
धणी न पुरे गाता ॥
कृपा करी दीनावरी ।
महाराजा समर्था ॥

जय जय श्रीशनिदेवा..

दोन्ही कर जोडोनीया ।
रुक्मा लीन सदा पायी ॥
प्रसाद हाचि मार्गे ।
उदयकाळ सौख्य दावी ॥

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download शनिदेवाची आरती MP3 (FREE)

♫ शनिदेवाची आरती MP3
शनिदेवाची आरती PDF

Download शनिदेवाची आरती PDF

शनिदेवाची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App