Shri Vishnu

दशावताराची आरती

Dashavatarachi Aarti Marathi Lyrics

Shri VishnuAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

॥ दशावताराची आरती ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटि नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनिया देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागता शंखासुरा तुझा वर देसी ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..

रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठी देवा कासव झालासी ॥
दाढे धरुनी पृथ्वी नेता वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..

पाचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारी तिष्ठसी ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..

मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिले सीतेला ॥
पितृवचनालागी रामे वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..

देवकीवसुदेवबंदीमोचन त्वा केले ।
नंदाघरी जाउनी निजसुख गोकुळा दिधले ।
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..

बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
दशावताराची आरती PDF

Download दशावताराची आरती PDF

दशावताराची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App