Misc

जय देवी मंगळागौरी – मंगळागौरीची आरती

Devi Mangalagauri Mangalagaurichi Aarti Marathi Lyrics

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

॥ जय देवी मंगळागौरी – मंगळागौरीची आरती ॥

जय देवी मंगळागौरी ॥
ओवाळीन सोनियाताटी ॥
रत्नांचे दिवे ॥
माणिकांच्या वाती ॥
हिरेया मोती ज्योती ॥

मंगळमूर्ती उपजली कार्या ॥
प्रसन्न झाली अल्पायुषी ॥
राया तिष्ठली राजबाळी ॥
अहेवपण द्यावया ॥

जय देवी मंगळागौरी..

पूजेला ग आणिती जाईच्या कळ्या ॥
सोळा तिकटी सोळा दूर्वा ॥
सोळा परीची पत्री ॥
जाई जुई आबुल्या शेवंतू नागचांफे ॥

जय देवी मंगळागौरी..

पारिजातकें मनोहरे ॥
गोकर्ण महाफुले ॥
नंदेटें तगरें ॥
पूजेला ग आणिली ॥

जय देवी मंगळागौरी..

साळीचे तांदूळ मुगाची डाळ ॥
अळणी खिचडी रांधिती नार ॥
आपुल्या पतीलागी सेवा करिती फार ॥

जय देवी मंगळागौरी..

डुमडुमे डुमडुमे वाजंत्रे वाजती ॥
कळावी कांकणे हाती शोभाती ॥
शोभती बाजुबंद ॥
कानी कापांचे गबे ॥
ल्यायिली अंबा शोभे ॥

जय देवी मंगळागौरी..

न्हाउनी माखुनी मौनी बैसली ॥
पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ॥
स्वच्छ बहुत होउनी ॥
अंबा पूजूं बैसली ॥

जय देवी मंगळागौरी..

सोनियाचे ताटी ॥
घातिल्या आता ॥
नैवेद्य षड्रसपक्वान्ने ॥
ताटी भरा मोदे जय० ॥

जय देवी मंगळागौरी..

लवलाहे तिघे काशी निघाली ॥
माऊली मंगळागौरी भिजवू विसरली ॥
मागुती परतुनिया आली ॥
अंबा स्वयंभू देखिली ॥
देऊळ सोनियांचे ॥
खांब हिरेयांचे ॥
वरती कळस मोतियांचा ॥

जय देवी मंगळागौरी..

Found a Mistake or Error? Report it Now

जय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती PDF

Download जय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती PDF

जय देवी मंगळागौरी - मंगळागौरीची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App