॥ येई हो विठ्ठले – विठ्ठलाची आरती ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ॥
येई हो विठ्ठले…
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥
येई हो विठ्ठले…
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥
येई हो विठ्ठले…
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ॥
येई हो विठ्ठले…
Found a Mistake or Error? Report it Now
