|| ओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती PDF ||
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥
चरणकमल ज्याचे अति सुकुम ।
ध्वजवज्रांकुश चरणी ब्रीदाचा तोडर ॥
ओवाळू आरती मदनगोपाळा..
नाभिकमळी ज्याचे ब्रह्मयाचे स्थान ।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन ।
ओवाळू आरती मदनगोपाळा..
मुखकमला पाहतां सूर्याच्या कोटी ।
वेधले मानस हारपली द्रुष्टी ।
ओवाळू आरती मदनगोपाळा..
जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान ।
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ॥
ओवाळू आरती मदनगोपाळा..
एका जनार्दनी देखियेले रूप ।
रूप पाहो जाता झाले अवघे तद्रूप ॥
ओवाळू आरती मदनगोपाळा..
Read in More Languages:- marathiअवतार गोकुळी – कृष्णाची आरती
- marathiश्यामलवर्णा षड्रिपुदमना – कृष्णाची आरती
- marathiआरती भुवनसुंदराची – कृष्णाची आरती
- hindiश्री बाँकेबिहारी आरती
- hindiगिरिधारी आरती
- hindiनटवर आरती
- hindiश्री कृष्ण कन्हैया आरती
- englishGiridhari Aarti
- englishNatavara Aarti
- englishShri Krishna Kanhaiya Aarti
- englishShri Yashodalala Aarti
- englishShri Bankebihari Aarti
- englishShri Krishna Bhog Aarti
- hindiश्री युगलकिशोर आरती
- englishShri Yugalkishor Aarti
Found a Mistake or Error? Report it Now
