Download HinduNidhi App
Shri Krishna

श्री कृष्णाची आरती

Krishna Aarti Marathi

Shri KrishnaAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ श्री कृष्णाची आरती ॥

ओवालू आरती मदनगोपाळा।
श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा॥

चरणकमल ज्याचे अति सुकुमार।
ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान।
ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी।
वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान।
तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

एका जनार्दनी देखियले रूप।
रूप पाहों जाता झालेसें तद्रूप॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download श्री कृष्णाची आरती PDF

श्री कृष्णाची आरती PDF

Leave a Comment