Shri Krishna

आरती भुवनसुंदराची – कृष्णाची आरती

Bhuwansundarachi Krushnachi Aarti Marathi Lyrics

Shri KrishnaAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

॥ आरती भुवनसुंदराची – कृष्णाची आरती ॥

आरती भुवनसुंदराची ।
इंदिरावरा मुकुंदाची ॥

पद्मसम पादयुग्मरंगा ।
ओवाळणी होति भृंगा ॥
नखमणि स्रवताहे गंगा ।
जे का त्रिविधतापभंगा ॥

वर्तुळ गुल्फ भ्राजमाने ॥
किंकिणीक्वणित, नाद घणघणित, वांकिवर झुणित, नूपुरे झन्न मंजिराची ।
झनन ध्वनी मंजिराची ॥

आरती भुवनसुंदराची…

पीतपट हाटकतप्तवर्णी ।
कांची नितंब सुस्थानी ॥

नाभिची अगाध ही करणी ।
विश्वजनकाची जे जननई ॥

त्रिवलीललित उदरशोभा ।
कंबुगळा माळ विलंबित, झळाळ कौस्तुभ, सरळ बाहू, श्रीवत्सतरलमणि मरळ कंकणाची ।
प्रीति बहु जडित कंकणांची ॥

आरती भुवनसुंदराची…

इंदुसम आस्य कुंदरदना ।
अधरारुणार्क-बिंबवदना ॥

पाहता भ्रांति पड़े मदना ।
सजलमेघाब्धि दैत्यदमना ॥

झळकत मकरकुंडलाभा ।
कुटिलकुंतली, मयूरपत्रावली वेष्टिली, तिलक भाळि केशरी झळाळित, कृष्णकस्तुरीची ।
अक्षता भाळि कस्तुरीची ।

आरती भुवनसुंदराची…

कल्पद्रुमातळी मूर्ती ।
सौदामिनी कोटिदीप्ती ॥

गोपीगोपवलय भवती ।
त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥

मंजुळ मधुर मुरलिनादे ।
चकित गंधर्व, चकित अप्सरा, सुरागिरिवरा, कर्पुराधरा, रतीने प्रेमयुक्त साची ।
आरती ओवाळित साची ॥

आरती भुवनसुंदराची…

वृंदावनीचिये हरणी ।
सखे गे कृष्ण माय बहिणी ॥

श्रमलो भवाब्धिचे फिरणी ।
आता मज ठाव देई चरणी ॥

अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ।
नमितो चरण शरण मी, करुणा येऊ दे विशालपाणीम कृष्ण नेणते बाळ आपुले, राखि लाज याची ।
दयानिधे राखि लाज याची ।

आरती भुवनसुंदराची…

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

आरती भुवनसुंदराची - कृष्णाची आरती PDF

Download आरती भुवनसुंदराची - कृष्णाची आरती PDF

आरती भुवनसुंदराची - कृष्णाची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App