।। श्रीहरितालिकेची आरती ।।
जयदेवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ।।
आरती ओवाळीतें । ज्ञानदीपकळिके ।। धृ।।
हरअर्धागीं वससी । जासी यज्ञा माहेरासि ।।
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडींत गुप्त होसी ।।१।।
रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी ।।
उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ।। २।।
तापपंचाग्निसाधनें । धूम्रपानें अधोवदनें ।।
केली बहू उपोषणें । शंभु भ्रतारकारणे ।। ३।।
लीला दाखविसी दृष्टी । हें व्रत करिसी लोकांसाठीं ।।
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावें संकटीं ।। ४।।
काय वर्ण तव गुण । अल्पमति नारायण ।।
मातें दाखवीं चरण । चुकवावें जन्म मरण ।। ५।।
- hindiमाता पार्वती – आरती
- marathiमंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती
- marathiवटसावित्रीची आरती
- englishParvati Mata Aarti
- hindiश्री गौरी माँ की आरती
- englishShri Gauri Maa Aarti
- hindiश्री पार्वती जी की आरती
Found a Mistake or Error? Report it Now