उठा पांडुरंगा आता – काकड आरती PDF मराठी
Download PDF of Utha Panduranga Ata Kakad Aarti Marathi
Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
उठा पांडुरंगा आता – काकड आरती मराठी Lyrics
॥ उठा पांडुरंगा आता – काकड आरती ॥
उठा पांडुरंगा आता,
दर्शन द्या सकळा ।
झाला अरुणोदय,
सरली निद्रेची वेळा ॥
संत साधू मुनी अवघे,
झालेली गोळा ।
सोडा शेजसुख आता,
पाहू द्या मुखकमळा ॥
उठा पांडुरंगा आता..
रंगमंडपी महाद्वारी,
झालीसे दाटी ।
मन उतावेळ,
रूप पहावया दष्टी ॥
उठा पांडुरंगा आता..
राई रखुमाबाई,
तुम्हा येऊ द्या द्या ।
शेजे हालवुनी जागे
करा देवराया ॥
उठा पांडुरंगा आता..
गरुड हनुमंत,
उभे पाहती वाट ।
स्वर्गीचे सुरवर घेऊनि
आले बोभाट ॥
उठा पांडुरंगा आता..
झाले मुक्तद्वार,
लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा
घेऊनी काकडा ॥
उठा पांडुरंगा आता..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowउठा पांडुरंगा आता – काकड आरती
READ
उठा पांडुरंगा आता – काकड आरती
on HinduNidhi Android App