Download HinduNidhi App
Misc

उठा पांडुरंगा आता – काकड आरती

Utha Panduranga Ata Kakad Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ उठा पांडुरंगा आता – काकड आरती ॥

उठा पांडुरंगा आता,
दर्शन द्या सकळा ।
झाला अरुणोदय,
सरली निद्रेची वेळा ॥

संत साधू मुनी अवघे,
झालेली गोळा ।
सोडा शेजसुख आता,
पाहू द्या मुखकमळा ॥

उठा पांडुरंगा आता..

रंगमंडपी महाद्वारी,
झालीसे दाटी ।
मन उतावेळ,
रूप पहावया दष्टी ॥

उठा पांडुरंगा आता..

राई रखुमाबाई,
तुम्हा येऊ द्या द्या ।
शेजे हालवुनी जागे
करा देवराया ॥

उठा पांडुरंगा आता..

गरुड हनुमंत,
उभे पाहती वाट ।
स्वर्गीचे सुरवर घेऊनि
आले बोभाट ॥

उठा पांडुरंगा आता..

झाले मुक्तद्वार,
लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा
घेऊनी काकडा ॥

उठा पांडुरंगा आता..

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download उठा पांडुरंगा आता - काकड आरती PDF

उठा पांडुरंगा आता - काकड आरती PDF

Leave a Comment