Download HinduNidhi App
Parvati Ji

वटसावित्रीची आरती

Vatsavitrichi Aarti Marathi

Parvati JiAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

।। वटसावित्रीची आरती ।।

अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ।।
अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें का प्रणीला ।।
आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ।।

आरती वडराजा ।। १ ।।

दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ।।
भावे करीन मी पूजा । आरती वडराजा ।। धृ।।
ज्येष्ठामास त्रयोदशी । करिती पूजन वडाशीं ।।
त्रिरात्र व्रत करूनीया । जिंकी तूं सत्यवंताशी ।

आरती वडराजा ।। २ ।।

स्वर्गावरी जाऊनियां । अग्निखांब कचळीला ।।
धर्मराजा उचकला। हत्या घालील जीवाला ।
येई ग पतिव्रते ।। पती नेई गे आपुला ।।

आरती वडराजा ।। ३ ।।

जाऊनियां यमापाशीं । मागतसे आपुला पती ।।
चारी वर देऊनियां । दयावंता द्यावा पती ।।

आरती वडराजा ।। ४ ।।

पतिव्रते तुझी कीर्ति । ऐकुनी ज्या नारी ।।
तुझें व्रतें आचरती । तुझी भुवनें पावती ।।

आरती वडराजा ।। ५ ।।

पतिव्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ।।
स्वर्गी पुष्पवृष्टी । करुनियां आणिलासी आपुला पती ।
अभय देऊनियां । पतिव्रते तारी त्यासी ।। ६ ।।

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
वटसावित्रीची आरती PDF

Download वटसावित्रीची आरती PDF

वटसावित्रीची आरती PDF

Leave a Comment